(रत्नागिरी / दादा जाधव)
‘जिल्हा एक एक्सपोर्ट हब’ संकल्पनेवर आधारीत एका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन देवरूख पंचायत समिती येथे करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण आज शुक्रवार दि.11 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृहात मान्यवरांच्या व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत संंपन्न होणार आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन आणि संगमेश्वर तालुका ऍग्रो स्टार फार्म फ्रेश प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, उत्पादक यांना नव्या व्यवसायाचा आरंभ कसा करावा, तसेच त्याचे क्षमताधिष्ठीत व्यवस्थापन कसे करावे या संबंधीचे मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या कालावधीत होणार्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी, उद्योजक, बागायतदार यांनी नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने अध्यक्ष संजय कांबळे (9422965562), उपाध्यक्ष विलास शेलार (9891631144), सचिव बाळकृष्ण लिंगायत (9423292966) यांनी केले आहे. सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा जिल्ह्यातील जनतेला नक्कीच फायदा होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.