( खेड / प्रतिनिधी )
खेड तालुक्यातील मौजे भरणे येथे जुगार खेळताना चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रमेश सिताराम टेमकर (52, भरणे बाईतवाडी, खेड), रुपेश राजेंद्र शिंदे (25, सुकिवली, घाणेकरवाडी, खेड), अक्षय एकनाथ शिवगण (25, नातूनगर, बेलोसेवाडी, खेड), दिनेश दिलीप रसाळ (39, खोंडे मधलीवाडी, खेड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. ही घटना 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.15 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे भरणे येथे गैरकायदा मटका जुगार खेळला जात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली असता चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 2650 रुपये किंमतीची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून आले. पोलिसांनी रमेश टेमकर, रुपेश शिंदे, अक्षय शिवगण, दिनेश रसाळ या चौघांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 1887 कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.