(देवरुख / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील दुर्मिळ रक्तचंदनाच्या झाडाची तहसीलदार सुहास थोरात पाहणी केली. तक्रारदार व ग्रामस्थांचे जबाब यावेळी लिहून घेण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुहास थोरात यांनी दिली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथे रक्तचंदनाचे दुर्मिळ झाड आहे. रक्तचंदनाचे झाड असल्यामुळे येथे कोणीही येतो, त्याच्या फांद्या तोडतो, झाडाची मुळे कापण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हा वृक्ष चाफवलीतून नामशेष होण्याची भीती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या झाडाच्या संरक्षणआणि संवर्धनासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. रक्तचंदनाचे हे झाड ४०० वर्षांपूर्वीचे असून, या वृक्षाचे संवर्धन आणि शासनाकडून संरक्षण व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात धाव घेतली. प्रशासनाने या झाडाचे संरक्षण करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने राजन बोडेकर यांच्या नेतृत्वाखाली केली आहे.
याच पार्श्वभूमीवर चाफवली येथील दुर्मिळ रक्तचंदनाच्या झाडाची सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी तहसीलदार सुहास थोरात पाहणी केली. तक्रारदार राजन बोडेकर व काही ग्रामस्थांचे जबाब लुहून घेण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुहास थोरात यांनी दिली. वरीष्ठ स्तरावरून मिळणाऱ्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार थोरात यांनी नमूद केले आहे.