चंद्रमुखी या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. फक्त अभिनय आणि सौंदर्यच नाही, तर कोणत्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण न घेता अमृताच्या डान्सने अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे. तिच्या ‘चंद्रा’ गाण्याने सर्वांवर आपली छाप पाडली आहे.
अख्ख्या महाराष्ट्राला नाचवणाऱ्या चंद्राची भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांवरही भुरळ पडली आहे. अमृता सध्या ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये तिच्या डान्सची जादू दाखवत होती. ती या शोमध्ये टॉपलाही होती. मात्र ती या शोमधून बाहेर पडली आहे. तिच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच आहे.
अमृता ‘झलक दिखला जा’ मधून बाहेर पडली आहे. टॉप ३ मध्ये अमृता पोहोचेल अशी चर्चा सुरू असताना ती स्पर्धेतून बाहेर पडल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. अमृतासोबत पारस कलनावत हा देखील स्पर्धेबाहेर पडलाय. प्रत्येक हफ्त्यात एक स्पर्धक शो बाहेर जात असतो. मात्र यावेळी शोमध्ये डबल एलिमिनेशन झाल्यानं प्रेक्षकही नाराज असल्याचं समजते.
यावेळी करण जोहरने स्पर्धेतून बाहेर जाणाऱ्या स्पर्धकाचं नाव घोषित केल आहे. यावेळी कुणालीही ते नाव अमृताचं असेल असं वाटलं नव्हतं. तिचं नाव घेतानाच तिच्यासह स्पर्धक आणि प्रेक्षकांनाही धक्काच बसला. कोणीही तिच्या या एलिमेशनची अपेक्षाच केली नव्हती. हा निर्णय सर्वांसाठीच धक्कादायक होता.
याबाबत अमृता बोलताना म्हणाली, तिला कधी वाटतं नव्हतं, ती इतक्या लवकर या स्पर्धेतून बाहेर पडेल. परिक्षक माधुरी यांनी तिला १०१ रुपयाचं बक्षिस दिलं होतं. तो क्षण तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असताना रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्याबाबत तिने सांगितलं होतं कि ‘झलक दिखला जा’ मध्ये केवळ माधुरी दीक्षित यांच्यासमोर नृत्य सादर करता येईल यासाठीच ती सहभागी झाली होती. अमृता या स्पर्धेतील महत्वाची स्पर्धक होती. तिने तिच्या अदाकारी नृत्याने सर्वांनाच भूरळ घातली होती. त्यामुळेच तिच्या या शोमधली एक्झिटने सर्वांनाच आश्चर्ययाचा धक्का दिला आहे.