(मुंबई)
राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याबाबतची माहिती दिली आहे.
#Dapoli Resorts Farud. FIR registered against #AnilParab & others under IPC 420
दापोली रिसॉर्ट्स घोटाळा. अनिल परब आणि इतरांविरुद्ध आयपीसी 420 अंतर्गत एफआयआर गुन्हा दाखल @mieknathshinde @Dev_Fadnavis @BJP4India pic.twitter.com/dIBjoOXYFy
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) November 8, 2022
रत्नागिरीच्या दापोली येथे अनिल परब यांचे हे साई रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट आपल्या मालकीचे नसल्याचे अनिल परब यांनी वारंवार स्पष्ट केलं असलं तरी हे रिसॉर्ट परब यांचंच असल्याचा दावा सोमय्या यांनी केलेला आहे.
किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर परब यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. इतकंच नाही तर, परबांची तब्बल 13 तास चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान, आता अनिल परब यांच्यासह इतरांविरोधात रत्नागिरीच्या दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे.