(जाकादेवी / वार्ताहर)
विश्व समता कला मंच लोवले तालुका संगमेश्वर या सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी राज्यभरातून प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन विश्व समता मंचातर्फे करण्यात आले आहे. सदरचे पुरस्कार वितरण २०२३ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात होणार आहे. बुध्द, फुले, शाहू,आंबेडकर या महामानवांच्या क्रांतिकारी विचारांची जोपासना करणाऱ्या, गेली १७ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक, कला, क्रीडा, जल,पर्यावरण इ.क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना प्रतिवर्षी राज्यस्तरीय विश्व समता कला मंचातर्फे विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना बहुमानाचे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.यावर्षीही राज्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
पुरस्काराचे स्वरूप -आकर्षक मानपत्र, सन्मानचिन्ह, मानाचा पट्टा असे आहे. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक, कला,क्रीडा, जल, पर्यावरण व पत्रकार क्षेत्रात लौकिकास्पद कार्य करणारे व्यक्तींनी आपले परिपूर्ण प्रस्ताव खालील प्रमाणे पाठवावेत.
यामध्ये संपूर्ण बायोडाटा, दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटो, कार्यक्षेत्र ,आता पर्यंत केलेल्या कार्याचा अहवाल, झेरॉक्स सत्य प्रत, फोटो अहवाल आवश्यक शिफारस पत्र नगरसेवक, मुख्याध्यापक, सरपंच यांचेही चालेल. १० रूपयांचे दोन पोस्टाचे तिकीट लावलेले लिफापेसह आपला परिपूर्ण प्रस्ताव १६ डिसेंबर पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पाठवणे बंधनकारक आहे.
तरी इच्छुकांनी आपले प्रस्ताव वेळेत पाठविण्याचे आवाहन विश्व समता मंचाचे धडाडीचे व उपक्रमशील अध्यक्ष मनोज जाधव यांनी केले आहे.संस्थापक -अध्यक्ष मु.पो.सावर्डे, बौध्दकाँलनी ता.चिपळूण जि.रत्नागिरी या पत्यावर प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन कला मंचातर्फे करण्यात आले आहे.