(रत्नागिरी)
अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या वार्षिकोत्सवाचे मानकरी प्रसाद आंगणे यांनी रत्नागिरी येथील श्री देवी नवलाई पावणाई मंदिर तांबट आळी येथील जीर्णोद्धारासाठी नुकतीच एक लाखांची देणगी दिली
प्रसाद आंगणे हे पुणे येथे नोकरी करीत असून रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील प्रकाश मयेकर यांचे जावई आहेत. नुकतीच त्यांनी रत्नागिरी येथील भैरी देवस्थानला भेट दिली, त्यावेळी त्यांनी ही देणगी दिली. या वेळी देवस्थानचे विश्वस्त विकास मयेकर व अन्य मानकरी तसेच सौ सायली मयेकर, आंगणे सहकुटुंब आदी उपस्थित होते.