(मुंबई)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ नोव्हेंबर असून ती १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० नोव्हेंबर असून ती २५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२३च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्याथ्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत.