रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांना फटका बसला असून आत्तापर्यंत तालुक्याच्या विविध भागात 15 लाखांचे नुकसान झाल्याचा अधिकृत आकडा हाती आला आहे. यामध्ये घरे, गोठे, सार्वजनिक सभागृह, शौचालये यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ठिककठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले असून सुमारे 36 तासांनी तालुक्याच्या काही भागात वीज पूरवठा सुरु झाला तर, अन्य भागात महावितरणचे कर्मचारी वीज पूरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. देवरुख तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील घरे, गोठे, सार्वजनिक पाण्याची टाकी, एक रिक्षा, शेतघर, शाळा, शौचालये, दूध शितकरण केंद्र साडवली असे सर्व मिळून 15 लाख 53 हजार 650 रुपयांचे नुकसान झाले आहे .