(राजापूर)
राजापूर पूर्व भागातील सर्वात मोठी असलेली बाजारपेठ म्हणजे पाचल बाजारपेठ. जवळजवळ पस्तीस ते चाळीस गावातील लोक या बाजारपेठेत खरेदीसाठी येतात. या गावचा सर्वात मोठा बाजार बुधवारी भरतो, त्यामुळे या बाजारावेळी खूप मोठी गर्दी होते आणि गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होते. स्थानिक पोलीस प्रशासनाच्यावतीने वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी काळजी घेतली जाते. प्रत्येक वेळी वाहन चालकांना समज देऊन वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यात येतात.
विना कागदपत्र असलेली वाहने, विना लायसन्स असलेले वाहन चालक बुधवारच्या बाजारात गैरपद्धतीने ये ये जा करून वाहतुकीची कोंडी करत असल्याने यांच्यावर नियंत्रण राहावं, वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून बुधवारी बाजाराच्या दिवशी रायपाटण पोलीस दूरक्षेत्र चे ठाणे अमलदार कमलाकर तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्यावतीने वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने धडक मोहीम हाती घेतली गेली. यामध्ये असंख्य मोटर वाहन केसेस करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत पो. कॉ. भीम कोळी पो.कॉ. निलेश कात्रे,पो.कॉ. सुजित पाटील यांचा सहभाग होता. पोलीस प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे बुधवारचा बाजार असूनही गर्दीच्या वेळी देखील वाहतुकीच्या नियंत्रणामुळे वाहतूक सुरळीत असल्याचे सांगण्यात आले. तसेच यापुढे गैरशिस्त वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचीही माहिती रायपाटण पोलीस दूरक्षेत्र चे ठाणे अमलदार कमलाकर तळेकर यांनी दिली आहे.