(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील तळसर येथील एका 12 वर्षीय बालकाचा विंचूदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गौरव निलेश लाड (12, तळसर) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. गौरव हा इयत्ता 6 वीत शिक्षण घेत होता. गौरवच्या मृत्यूने तळसर कुटुंबावर मोठा आघात झाला असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना रविवार 30 ऑक्टोबर रोजी घडली.
सविस्तर वृत्त असे की, गौरव हा अंगण परिसरात खेळत असताना त्याला विंचवाने दंश केला. त्याला याची जाणीव सुध्दा नव्हती. मात्र पायाला चावा घेतlला असल्यामुळे आणि नंतर तेथील जागा काळी पडल्यामुळे त्याने घरच्यांना माहिती दिली. पालकांनी लगेचच त्याला शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या मृत्यूने पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 12 व्या वर्षी मुलाला अग्नी देण्याची वेळ आई वडिलांवर आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.