(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार सध्या प्रशासकाच्या हातात आहे. त्यामुळे प्रशासकीय कारभार चालवताना दाखले, उतारे यांच्यासाठी आकारले जाणारे शुल्क वाढ करण्याचे अधिकारी प्रशासकाला आहेत. प्रशासनाने उतारे व दाखल्यांसाठी आकारल्या जाणार्या शुल्कामध्ये तब्बल दुप्पटीने वाढ केली आहे. या वाढीसंदर्भात 11 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांच्या हरकती मागवण्यात आल्या आहेत. हरकती न आल्यास 1 जानेवारी 2023 पासून या दुप्पट शुल्काची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
पूर्वी असेसमेंट उतारा – 100 रु., असेसमेंट नाव दाखल करणे, दुरुस्ती – 350 रु., व्यवसायासाठी दाखला – 1000 रु., वसुली विभागाचे सर्व दाखले (प्रत्येकी) 100 रु., भूखंड नसलेबाबत दाखला – 100 रु.
प्रशासनाने ठरवलेले उतारा व दाखल्यांसाठीचे दर
असेसमेंट उतारा – 200 रु.
असेसमेंट नाव दाखल करणे, दुरुस्ती – 750 रु.
व्यवसायासाठी दाखला – 2000 रु.
वसुली विभागाचे सर्व दाखले (प्रत्येकी) 200 रु.
भूखंड नसलेबाबत दाखला – 200 रु.
सर्व्हेक्षण उतारा (प्रत्येक प्रतीसाठी) – 20 रु.
एवढी रक्कम आकारण्यात येणार आहे.