(रत्नागिरी)
भारतीय जनता पार्टीचे उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मुकेश गुप्ता यांनी काल रत्नागिरी येथील भाटये समुद्रकिनारी झरी विनायक मंदिराशेजारी ‘छट पूजेचे’ आयोजन केले होते.
उत्तर भारतीय लोकांचा हा पवित्र उत्सव मानला जातो. जेवढे पण उत्तर भारतीय लोक देशातील कोणत्याही शहरात वास्तव्यास आहेत ते मोठ्या भक्तीभावाने हा उत्सव साजरा करतात.
रत्नागिरीमध्ये झालेल्या या छटपूजेला भाजपचे नेते, माजी आमदार बाळासाहेब माने, सौ. माधवी माने व मुकेश गुप्ता जिल्हा अध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा आघाडी व इतर उत्तर भारतीय बांधव उपस्थित होते.