(संगलट-खेड / इक्बाल जमादार)
दापोली तालुक्यातील गावतळे ग्रामपंचायतीमधील गाव पॅनल नवनिर्वाचित सरपंच सौ.विधी विनोद पवार व सदस्य यांची दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ गुरुवार रोजी गावतळे येथे भेट घेऊन दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री.संजयराव कदम यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गावपॅनल गावतळे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सौ.विधी विनोद पवार व सदस्य यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते व दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री.मुजीब रूमाणे, उद्योजक श्री.भाई पवार, गावतळे ग्रामपंचायत सरपंच सौ.विधी विनोद पवार, ग्रामपंचायत सदस्य श्री.नामदेव यशवंत पवार, ग्रामपंचायत सदस्य श्री.राम राजाराम पवार, ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रणव चंद्रकांत पवार, श्री.जयेश मोरे, श्री.विनोद पवार तसेच सर्व ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.