(सिडनी)
पाकिस्तानला हरवण्यात सिकंदर रझा या खेळाडूचा मोठा सिंहाचा वाटा आहे. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का? सिकंदर रझा कोण आहे तो? सिकंदर रझा हा पाकिस्तानात जन्मलेला हे. मात्र चांगल्या संधीच्या शोधात झिम्बाब्वेत खेळायला गेलेल्या सिकंदर रझानेच ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्याच पराभवाचा पाया रचला आणि झिम्बाब्वे कडून खेळाचे उत्तम प्रदर्शन करत माय भूमीतील पाकिस्तानच्या खेळाडूंनाच नेस्तनाबूत केले.
झिम्बाब्वेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या शिस्तबद्ध बॉलिंगसमोर त्यांना 130 धावांपर्यत मजल मारता आली. शॉन विल्यम्स याने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली.
पाकिस्तानतर्फे मोहम्मद वासिम 24 धावा मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. शदाब खानने 3 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना भरवशाचे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान झटपट तंबूत परतले. बाबर 4 तर रिझवानने 14 धावा केल्या. पर्थच्या खेळपट्टीशी जुळवून घेता न आलेल्या पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी स्थिरस्थावर होण्यास संधीच दिली नाही. शान मसूदने 38 चेंडूत 44 धावांची मोठी खेळी करत पाकिस्तानच्या आशा पल्लवित केल्या. मसूद आऊट झाल्यानंतर मोहम्मद नवाझने 22 रन्सची खेळी करत झिम्बाब्वेच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याची तयारी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू मध्ये 11 धावांच आव्हान पाकिस्तानला पेलवता आलं नाही. दुसऱ्या चेंडूवर 6 धावा घेत नवाझने बाजी पलटवण्याचा प्रयत्न केला पण नवाझ बाद झाला आणि पाकिस्तानचं नशिबाने धोका दिला. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी पाकिस्तानला 3 धावांची आवश्यकता असताना आफ्रिदीने जोरदार मारलेला चेंडू बाँड्री लाईनवर पोहोचला. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्यासाठी वसीम हा जोराने धावत सुटला मात्र आफ्रिदी हा विकेट किपर पर्यंत पोहोचण्यापूर्वीच धावचीत झाला. पाकिस्तानच्या विजयाला सुरुंग लावण्याचे काम रझा याने केले आणि तिथून पुढे हा सामना झिमाब्वेच्या ताब्यात गेला. आणि झिमाब्वेच्या खेळाडूंनी एकच जल्लोष साजरा केला. सिकंदर रझा याने 25 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. सिकंदरलाच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
हा सिकंदर रझाचा प्रवास
‘सिकंदर’ रझाचा जन्म पाकिस्तानातल्या सियालकोट येथे झाला. 2013 मध्ये सिकंदर झिम्बाब्वेतर्फे खेळणारा नॉन रेसिडेन्शियल खेळाडू ठरला. तासादक हुसेन रझा म्हणजे सिकंदरच्या बाबांचा मोटार पार्ट्सचा व्यवसाय आहे. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी पाकिस्तानातून झिम्बाब्वेला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सिकंदर स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथे सॉफ्टवेअरचं शिक्षण घेत होता. लढाऊ विमान पायलट होण्याचं सिकंदरचं स्वप्न होतं. मात्र डोळ्यांमध्ये असणाऱ्या एका विकारामुळे सिकंदरची निवड झाली नाही. दुसरं वेड म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचा ध्यास जपण्यासाठी सिकंदरने झिम्बाब्वेला जाण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून सिकंदर क्रिकेट खेळायचा.
स्कॉटलंडमध्ये शिकत असतानाच सिकंदर तिथेही क्रिकेट खेळायचा. त्याचवेळी झिम्बाब्वेची राजधानी हरारेमधल्या एका लीगमध्येही त्याने आपल्या कौशल्याची झलक दाखवली होती. झिम्बाब्वेला स्थायिक झाल्यानंतरही राष्ट्रीय संघासाठी खेळण्याकरता पात्र ठरण्यासाठी बरीच कागदपत्रे तयार करावी लागली. या काळात झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अलिस्टर कॅम्पबेलचा पाठिंबा त्याच्यासाठी मोलाचा ठरला. हरारेत बेलव्हेडरे या भागात सिकंदरही राहतो. जेव्हा जेव्हा झिम्बाब्वेत सामना असतो, सिकंदरला साथ देण्यासाठी तिथे शेकडो माणसं उपस्थित असतात.
गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर कमाल दाखवणारा सिकंदर अल्पावधीतच झिम्बाब्वे संघाचा तारणहार ठरला. सिकंदरने बांगलादेशविरुद्ध दोन तर भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये शतकी खेळी साकारली होती. 17 टेस्टमध्ये 35.96च्या सरासरीने 1187 रन्स केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. 123 वनडेत सिकंदरच्या नावावर 3656 रन्स असून यामध्ये 6 शतकं आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेन्टी20 प्रकारात सिकंदरने 62 सामन्यात 1176 रन्स केल्या असून त्याचा स्ट्राईकरेट 129.23 एवढा आहे. सिकंदरने टेस्टमध्ये 34, वनडेत 70 आणि ट्वेन्टी20 प्रकारात 33 विकेट्स पटकावल्या आहेत.