(खेड / इकबाल जमादार)
गेल्या काही दिवसांपासून रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या हसणी नासिर हुसेन उर्फ इराणी या सराईत चोरट्यास रायगडमधील स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने गजाआड केले. त्याच्याकडून 62 ग्रॅम व 670 मिलीग्रॅम वजनाचे 1 लाख 69 हजार 487 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्या अटकेमुळे कोकणातील कुडाळ, कणकवली, खेड येथे केलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सनी इराणी याला घाटकोपर- मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. तो मूळ कर्नाटक राज्यातील बिदरचा रहिवासी असल्याचे तपासात पुढे आले आहे. चौकशीत त्याने गुह्याची कबुली दिली असून त्याच्यावर रायगड जिह्यातील रोहा, महाड पोलीस स्थानकात गुह्याची नोंद आहे. एलसीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, महेश कदम, पोलीस हवालदार अमोल हंबीर, पोलीस हवालदार झेमसे, जितेंद्र चव्हाण, प्रतिक सावंत, राकेश म्हात्रे, महिला पोलीस मोकल, जाधव, खराटे, मोरे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.