श्री रामाची नगरी असलेल्या अयोध्येच्या आगळ्यावेगळया दिवाळीची सध्या जगभर चर्चा आहे. येथील दीपोत्सव पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येथे येतात. अयोध्येची ओळख धार्मिक व सांस्कृतिक शहर म्हणून आहे. तत्पूर्वी, दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत दिपोत्सव साजरा केला, त्याआधी सरयू नदीच्या काठावर झालेल्या आरती कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते.
अयोध्येतील सरयू नदीच्या काठावर लावलेले हे दिवे लोकसहभागाचे प्रतीक आहेत. यातून सर्वांचे सहकार्य, सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास दिसून येतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. लाखो मातीच्या दिव्यांनी शरयू नदीकाठ उजळून निघाला, दरम्यान दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या लेझर शोने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दरवर्षी पंतप्रधान मोदी सीमेवर कर्तव्यावर असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करायचे. मात्र यावेळी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत दिवाळी साजरी केली आहे.
हजारो स्वयंसेवक शरयूच्या काठावर पोहोचतात आणि मातीचे दिवे लावतात. विद्यार्थी व मुली नदीकाठावर रांगोळी काढतात. आठवडाभरापूर्वीपासून शरयूच्या काठावर यासाठी जोरदार तयारी सुरू होती. त्याचवेळी लोकांनी संपूर्ण अयोध्या नववधू सारखी सजवली होती. दीपोत्सवानिमित्त अयोध्या रंगीबेरंगी दिव्यांनी स्नान करताना दिसत आहे. येथे लेझर शोचेही आयोजन करण्यात आले आहे.