(मुंबई)
एसटी महामंडळाला कोरोना काळात मागील दोन वर्ष अतिशय खडतर गेले. कोविड काळात एसटी महामंडळाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर अनेक महिने सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला होता. तसेच संप काळातही मोठा आर्थिक फटका बसला. एकंदरीत सर्वच ठप्प झाले होते. आता काही दिवसांपासून एसटी सेवा सुरुळीतपणे सुरु झाली आहे. आता एसटी महामंडळाने नव्या बस रस्त्यावर उतरवायला सुरुवात केली असून, पहिल्या टप्प्यात राज्यात ७०० नवीन बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात लातूर आगाराला २१ बस देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपस्थित होते.
असे आहे नवीन बसचे फीचर
-टू बाय टू आसन व्यवस्था असणा-या या बस आहेत.
-बारा मीटर लांबीच्या बस
-प्रशस्त आसन व्यवस्था
-लग्जरी बससारखी व्यवस्था
-लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना या बसमध्ये त्रास होणार नाही
-या अत्याधुनिक बसच्या दरात मात्र वाढ करण्यात आलेली नाही
-भविष्यकाळात नवीन बसची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे.