(ठाणे)
ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. दोन गटांमध्ये संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घंटाळे परिसरात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. हा दोन गटांमधील वाद असण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समजत आहे. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, त्याच्यासोबत त्याचे सहकारी देखील होते. आपल्या कार्यालयातून ते रात्रीच्या वेळी ते कंदील पुरवण्याचं काम करत होते. त्याचवेळी हल्लेखोर तिथे पोहोचले आणि गोळीबार केला. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.