(रत्नागिरी)
शिक्षण सेवक नियमितीकरण होण्यासाठी जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी श्री. जगदाळे यांनी आदेश काढून तालुका स्तरावर कॅम्पचे आयोजन करण्याबाबत आदेशित केले. त्यानुसार जुलै 2022 पासून शिक्षण सेवक नियमितीकरण प्रस्ताव करण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर 2022 अखेर 3 वर्ष पूर्ण होणाऱ्या सर्वांचे प्रस्ताव सर्व तालुक्यांच्या शिक्षण विभाग पंचायत समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका अध्यक्ष, सचिव व तालुका कार्यकारिणीच्या सहकार्याने विशेष कॅम्प घेऊन सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्याला जमा झाले. त्यासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रांचे नमुने संघटनेमार्फत तयार करून देण्यात आले. त्यामुळे सर्व तालुक्यात एक वाक्यता येऊन विनात्रुटी प्रस्ताव जिल्ह्याला सादर झाले.
संबंधित टेबल चे क्लार्क श्री. पाडावे यांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून एकूण 290 प्रस्ताव उपशिक्षणाधिकारी श्री. संदेश कडव व शिक्षणाधिकारी श्री. जगदाळे यांनी मंजुरीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवले. याबाबत संघटनेमार्फत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सावंत यांच्या सहकार्याने तात्काळ दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी सर्व प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किर्ती किरण पुजार अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानुसार त्यावर सही होऊन सर्व शिक्षण सेवक बांधव 3 वर्षाचा वनवास संपवून नियमित शिक्षक झाले आहेत.
सदर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहकार्य करणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सावंत, शिक्षणाधिकारी श्री. वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी श्री. संदेश कडव, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्विय सहाय्यक श्री. दिनेश सिनकर, शिक्षण विभागातील संबंधित टेबलचे क्लार्क श्री. पाडावे,तालुक्यातून सर्व परिपूर्ण प्रस्ताव पाठवणारे सर्व तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी व सर्व पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्मचारी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे सर्व तालुकाध्यक्ष, सचिव व सर्व तालुका कार्यकारिणी यांचे आभार मानण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा रत्नागिरी चे अध्यक्ष श्री. अंकुश चांगण, सचिव श्री. दत्तात्रय क्षिरसागर, कार्याध्यक्ष श्री. राहुल तुगांवकर, कोषाध्यक्ष श्री. भालेराव (बालाजी) दराडे व जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. विभा बाणे तसेच संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीकडून कळविण्यात आले आहे.