(मुंबई)
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारर २१ ऑक्टोबरपूर्वी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं नुकतेच जारी केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारने ८९ हजार एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ४५ कोटी रुपयांची घोषणा सरकारनं केली आहे. एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून हा निधी दिला जाईल.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील ८९ हजार अधिकारी-कर्मचारी वर्ग ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते. तो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दिवाळी भेट म्हणून एसटी महामंडळाला ४५ कोटी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निधीतून एसटी अधिकाऱ्याना पाच हजार आणि कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये अशी दिवाळी रक्कम मिळणार आहे. या निर्णयामुळं महागाईच्या काळात ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना आधार मिळाला आहे.