[खेड / इक्बाल जमादार ]
खेड तालुक्यातील चिचघर ग्रामपंचायतीमध्ये प्रथमच मुस्लिम समाजाला न्याय देऊन सरपंच झाल्याने चिचघर गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
चिंचघर गावच्या प्रतिष्ठ समाजसेवक सो करीमूननिशा दस्तगीर सांगले यांची सरपंच पदी निवड करण्यात आली आहे. सदरची ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीची असल्याने या कामी माजी आमदार संजयराव कदम यांनी पुढाकार घेऊन मुस्लिम समाजाची लोकसंख्या कमी असताना आज सरपंच पदावर त्यांना विराजमान होण्याचे मान मिळाला आहे. त्यामुळे एक समाजाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरपंच करीमून निसा सांगळे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, आपण माजी आमदार संजयराव कदम यांच्या माध्यमातून सर्व समाजाला आपल्याबरोबर घेऊन विकास कामाला न्याय देणार आहोत. आपण माजी आमदार संजयराव कदम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन विकास कामाला चालना घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सदरची ग्रामपंचायत ही माजी आमदार संजयराव कदम यांच्या गावातील असल्याने विकासाला काही कमी पडून देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.