(दापोली)
बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेच्या ३०० शाखा पूर्ण झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लाखो आदिवासी कार्यकर्त्यानी बिरसा फायटर्स संघटनेत प्रवेश केला व नवीन शाखा तयार केल्या आहेत. या नवीन शाखांत चिपळूण, दापोली, मंडणगड व खेड तालुक्यातील तालुका शाखा व गाव शाखांचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात नुकत्याच नवीन शाखा जाहीर करण्यात आल्या. नवीन शाखांत चिपळूण तालुकाध्यक्ष पदी सुरेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर तालुका सचिवपदी अक्षय निकम यांची निवड करण्यात आली. सुरेश पवार, अक्षय निकमसह चिपळूणमधील हजारों आदिवासी कार्यकत्यांनी सुशिलकुमार पावरा यांच्या सामाजिक कामाला प्रभावित होऊन बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी सुरेश पवार यांची चिपळूण तालुकाध्यक्षपदी निवड केली व सचिव पदी अक्षय निकम यांची निवड केली. तसेच उर्वरित चिपळूण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
एका वर्षात ३०० पेक्षा अधिक शाखा असणारी बिरसा फायटर्स ही महाराष्ट्रातील पहिली व एकमेव आदिवासींची सामाजिक संघटना आहे. ही संघटना वैचारिक व लढाऊ आहे. बिरसा फायटर्स संघटना रोज राज्यातील आदिवासींच्या समस्या व सामाजिक नवनवीन विषय हाताळत आहे.
संघटनेची सभासद संख्या २ लाखांहून अधिक झाल्याचा अंदाज आहे. बिरसा पायटर्सच्या लढाऊ पदाधिकाऱ्यांच्या कामांना प्रभावित होऊन नवीन कार्यकर्ते बिरसा फायटर्स संघटनेत सामील होत आहेत.