(नवी दिल्ली)
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची सोमवारी देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांचा शपथविधी 9 नोव्हेंबर रोजी होईल. न्यायमूर्ती ललित यांचा कार्यकाळ 74 दिवसांचा होता, तर न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.
न्यायमूर्ती चंद्रचूड हे देशातील सर्वाधिक काळ सेवा बजावणारे मुख्य न्यायाधीश वायव्ही चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. त्यांच्या वडिलांनी 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 पर्यंत न्यायपालिकेचे सर्वोच्च पद भूषवले होते.
नवीन न्यायधीशांच्या नियुक्तीबाबात रिजिजू यांनी ट्वीट करून सांगिले की “राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, माननीय राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची देशाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती 9 नोव्हेंबर 2022 पासून लागू होईल. न्यायमूर्ती चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होतील”.