( संगमेश्वर / प्रतिनिधी )
देवरुखनजीक साडवली येथे वयोवृध्द महिलेला आपण पोलीस असल्याचे सांगत दीड लाखाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद श्रीमती कल्पना अनंत देसाई (76, साडवली, संगमेश्वर) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना देसाई या चालत जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आपण पोलीस इन्स्पेक्टर आहोत तपासणीसाठी आलो आहात अशी बतावणी करुन खाली चोरी, लुबाडणूक झाली आहे. तुमचे दागिने घालून असे फिरु नका ते काढून घ्या असे सांगितले. यावेळी दोघांनीही देसाई यांना हाताला खोबरेल ते लावण्यास दिले. त्यानंतर तुमचे दागिने बांधून देतो असे सांगितले. त्याप्रमाणे पुडीत खोटे दागिने बांधून देसाई यांना दिले आणि फरार झाले. देसाई यांनी पुडीतील बांगडया पाहिल्या असता खोटया असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेचच देवरुख पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दोन्ही अज्ञातांवर भादविकलम 420, 419, 170, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.