(गणपतीपुळे / वैभव पवार)
शिवसेना तालुका, युवासेना व शिवसेना शाखा मालगुंड आणि अथायु मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अथायु हेल्थकार्ड वाटप आणि महाआरोग्य शिबिर मंगळवारी 11 ऑक्टोबर रोजी मालगुंड ग्रामपंचायतीच्या कविवर्य केशवसुत सभागृहात घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे कोतवडे व वाटद जिल्हा परिषद गटाचे उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, कोतवडे गटाचे विभाग प्रमुख उत्तम मोरे ,मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी या उद्घाटन कार्यक्रमाला मालगुंडचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा उद्योजक शेखर खेऊर,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रोहित साळवी,संतोष चौगुले युगा सुर्वे, राजू साळवी, प्रकाश साळवी ,मंदार थेराडे आदी मान्यवर व मालगुंड ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.या महाआरोग्य शिबिरात मोफत छातीची पट्टी ( इ.सी.जी.)रक्तातील साखर व रक्तदाब आदींची तपासणी करण्यात आली तसेच हृदय विकाराची लक्षणे, मूत्र विकार व मुतखडा लक्षणे, हाडांची लक्षणे कॅन्सरपूर्व लक्षणे आदी रोगांबाबतची तपासणी करून संबंधित रुग्णांना उपचाराविषयी माहिती देण्यात आली.
या महाआरोग्य शिबिराला रत्नागिरी शिवसेनेचे धडाडीचे नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांनी भेट देऊन या स्तुत्य उपक्रमाबद्दल शिवसेनेच्या प्रमुख आयोजकांचे विशेष कौतुक केले आणि महाआरोग्य शिबिर राबवून मालगुंड परिसरातील गोरगरीब नागरिकांना लाभ मिळवून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या महाआरोग्य शिबिरात अथायु मल्टीस्पेशालीटी कोल्हापूर हॉस्पिटलचे डॉक्टर रवीकुमार केशरी ,डॉक्टर शुभम जोंधळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली डॉक्टर राया रायान्ना किंगळे, किशोरी गोंदणे, शाहीन तांबोळी, कोमलबुवा, उदय सूर्यवंशी, पांडुरंग आदींनी विशेष मेहनत घेतली तसेच सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व युवासेनेच्या व शिवसेना शाखा मालगुंडच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
तसेच या शिबिरासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक मोहन सातव यांच्या नेतृत्वाखाली आशा स्वयंसेविका सुजाता मांडवकर, समीक्षा मेणये, साधना पवार यांचे विशेष सहकार्य लाभले या महाआरोग्य शिबिरात मालगुंड परिसरातील एकूण 80 रुग्णांनी लाभ घेतल्याची माहिती प्रमुख आयोजकांकडून देण्यात आली