(रत्नागिरी)
शहरातील गोदूताई जांभेकर शाळेत हिंदी पंधरवडा साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
30 सप्टेबर रोजी ‘हिंदी पंधरवडा’ गोंदूताई जांभेकर शाळेमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शुभांगी आनंद तापेकर, कुंडलिक कांबळे, मुख्याध्यापक अनिल चव्हाण आणि हिंदी शिक्षिका स्नेहल पावरी उपस्थित होते. शुभांगी तापेकर यांनी मुलांना हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले. हिंदीकडे फक्त भाषा म्हणून बघू नका तर त्यामधून कसे करिअर करता येते याबद्दल मार्गदर्शन केले. स्नेहल पावरी व अनिल चव्हाण यांनीदेखील हिंदी भाषेचे महत्त्व मुलांना सांगितले. कुंडलिक कांबळे यांनी उपस्थित मुलांना हिंदी कविता ऐकवली.
यावेळी मुलांना चिक्की वाटप करण्यात आले. हिंदी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सिध्दी प्रकाश मडके, गौरी संतोष शेलार, मंजिरी अमोल सावंत, फिजा जहाँगीर खान यांना शुभांगी तापेकर, अनिल चव्हाण, स्नेहल पावरी, कुंडलिक कांबळे यांच्याहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.