(क्रीडा)
महिला आशिया चषकामध्ये भारताने थायलंडचा अवघ्या ६ षटकांत म्हणजे अवघ्या ३६ चेंडूंत पराभव केला. टीम इंडियाने प्रथम थायलंडच्या संघाला १५.१. षटकांत ३७ धावांत गुंडाळले, त्यानंतर प्रत्युत्तर देत ६ षटकांत ९ विकेटनी शानदार विजय मिळवला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाने सामना पूर्णपणे एकतर्फी केला. भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. आता भारताचे ६ सामन्यांत १० गुण झाले आहेत. विशेष म्हणजे याच थायलंड संघाने पाकिस्तानला हरवले होते आणि पुढच्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला होता.
याआधी थायलंडने सलग तीन सामने जिंकले होते. त्यांनी रविवारी मलेशियाचा ५० धावांनी पराभव केला. यापूर्वी, ७ ऑक्टोबर रोजी यूएईचा १८ धावांनी आणि एक दिवस आधी म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा ४ विकेटसूने पराभव केला होता. पण, भारतीय संघाने त्यांचा विजयी रथ रोखला.
नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने थायलंडला १५.१ षटकांत ३७ धावांत गुंडाळले. थायलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. त्यांच्याकडून फक्त एक फलंदाज नानपत कोंचनारि ओनकाई (१२) दुहेरी अंकापर्यंत पोहोचली. भारताकडून स्नेह राणाने तीन तर राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शमनि प्रत्येकी दोन गडी बाद केले. मेघना सिंगला एक विकेट मिळाली. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६ षटकांत एक गडी गमावून ४० धावा केल्या आणि विजय मिळवला. त्याच्यासाठी सलामीवीर एस. मेघनाने १८ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने नाबाद २० धावा केल्या. त्याचवेळी शेफाली वर्माच्या रूपाने एकमेव विकेट पडली.
या सामन्यातील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भारताच्या महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर नाही तर स्मृती मानधना करत होती आणि हा तिचा १०० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता. संघाने आपल्या कर्णधाराला शानदार विजयी भेट दिली आहे.