(रत्नागिरी/वैभव पवार)
महागणपती मंदिर जिर्णोध्दार समिती श्री क्षेत्र नारशिंगे च्या अध्यक्षपदी सुनिल धावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील महागणपती मंदिर हे शिवकालीन आहे. येथील गणपतीची मूर्ती स्थापित केलेली आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. नदीचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. गणपतीपुळे पासून महागणपती मंदिर हे २६ किलोमीटर अंतरावर आहे.
महागणपती मंदिर हे शिवकालीन असल्यामुळे त्या मंदिराच्या नव्याने जिर्णोधार करण्यासाठी समस्थ ग्रामस्थांनी बैठक घेवून महागणपती मंदिर जिर्णोध्दार समिती नेमली. या समितीमध्ये प्रकाश दत्तात्रय रोडे उपाध्यक्ष, रविंद्र गोविंद कांबळे सचिव, संगम शंकर धावडे खजिनदार,सदस्य मोहन सिताराम पवार,युवराज अर्जुन कांबळे, संतोष गोविंद आग्रे, चंद्रकांत गणपत गोताड, प्रविण विष्णू कांबळे, नितिन सुर्यकांत रोडे, संदेश श्रीधर पवार आदींची निवड करण्यात आली.