(मुंबई/किशोर गावडे)
हिंदू धर्मीय नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. भांडुप पश्चिमेच्या द्राक्षबाग परिसरात मधु हॉस्पिटल जवळील श्री साई श्रद्धा सेवा मंडळ सलग 21 वर्ष सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करीत आहेत. या नवरात्रोत्सवात सालाबादप्रमाणे यंदाही आमदार रमेश कोरगावकर यांनी देवींचे दर्शन घेतले. सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ शिवसैनिक मंगेश तावडे यांनी कोरगावकर यांचे यावेळी स्वागत केले.
या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्गणीसाठी कुणावरही आजमितीपर्यंत जबरदस्ती केली जात नाही. जी काही यथाशक्ती देणगी असेल ती तुम्ही देऊ शकता. पण या माध्यमातून देवीचे कार्य केले जाते. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे साई श्रद्धा सेवा मंडळ असून मंडळाच्यावतीने राम नवमीच्या दिवशी या ठिकाणी साई भंडा-याचे आयोजन केलं जातं. अनेक साईभक्त भंडाऱ्याला उपस्थित असतात. भजन कीर्तन नामस्मरण केले जाते. आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवले जातात. मेडिकल कॅम्प आयोजित केली जातात. चष्मा शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर त्याचबरोबर मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव, होळी, श्री गणेशोत्सव असे विविध सण या ठिकाणी साजरे केले जातात.
श्री.मंगेश तावडे हे श्री साई श्रद्धा सेवा मंडळ द्राक्षाबाग या मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर दांडेकर, मुकेश निकम व आताचे कैलास पाटील यांनी या मंडळावर अध्यक्ष म्हणून चांगल्या प्रकारे कारभार केला आहे. सचिव म्हणून विशाल दिवेकर यांनी फार मेहनत व सुरुवातीच्या काळात जास्तच मेहनत केलेली होती. मंडळांच्या प्रत्येक कामात कृष्णा तळे उल्हास तळे, मनोहर चव्हाण, अरुण पाटील, मयूर पाटकर, दीपक बाबर व मयेकर तसेच राजेंद्र मोकल, उपविभाग प्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.
रविवारी मेडिकल कॅम्प फोर्टिस हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. विभागातील नागरिकांनी महिलांनी पुरुषांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. आमदार रमेश कोरगावकर यांनी मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या.