चिपळूण तालुका काँग्रेसने कोविड सहाय्य व मदत केंद्राच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना चांगला मदतीचा हात दिला आहे. जवळपास १४० हुन अधिक रुग्णांना आयसीयू व्हॅटीलिटर चे या हेल्पलाईनच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्तेनी मिळवुन दिले आहेत.
युवक काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष फैसल पिलपिले यांनी ही माहिती दिली कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णच्या नातेवाईकांना बेड व रेमडेसिविर मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे या परिस्थितीत कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना मदत मिळावी म्हणून युवक काँग्रेस ने हेल्पलाइन द्वारे सुरू केले होते १५ एप्रिल पासून सुरू करण्यात आलेल्या या मदत केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत साधारण बेड ८० ऑक्सीजन ४५ व्हेनटीलेटर १५ त्याच बरोबर रेमडेसिवीर प्लाजम टोसिलीजुमेब इंजेक्शन मिळवून देण्यात असल्याची महिती फैसल पिलपिले यांनी दिली
याशिवाय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री प्रशांत यादव यांनी उपजिल्हा रुग्णालयात ५००० मास्क दिले तसेच गरजू कुटुंबाना आर्थिक मदत पोलिस प्रशसनाला १लाखाची मदत तसेच तसेच जंतुनाशक फवारणी चे औषध वाटप तसेच गरजू कुटुंबाना अन्नधान्य वाटप रेशन किट आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी इ किट गरमपाण्याचे बॉटल विविध प्रकारची मदत केली असल्याची माहिती दिली