( रत्नागिरी )
बहु प्रतिक्षित टाटा मोटर्स चे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकृत कार विक्रेते एस. पी. ऑटोहब तर्फे टाटा अल्ट्रोज, पंच, टियागो CNG ई.वाहनांचे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर वितरण झाले. गोवा, गुजरात, राजस्थान येथील यशस्वी वाटचाली नंतर एस. पी. कार्स ने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे खास ग्राहकांच्या सोई करिता टाटा कार्स चे सेल्स आणि सर्व्हिस सुविधा देण्याचे निश्चित केले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी येथे अत्याधुनिक सेवा आणि सुविधांनी सुसज्ज असे प्रशस्त शोरुम आणि वर्क शॉप चे बांधकाम सुरू झाले असून लवकरच ग्राहकांच्या सेवेत हजर होत आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे देखील लवकरच शोरुम आणि वर्कशॉप सुरू होणार आहे.
दरम्यान ग्राहकांना टाटा वाहनांचा अनुभव आणि आनंद घेता या उद्देशाने एस. पी. ऑटोहब यांनी नवीन शोरुम मध्ये स्थानांतरित होणे पूर्वी अधिक सोईकरिता तात्पुरत्या स्वरूपाचे सेल्स आउटलेट मिरजोले एम.आय.डी.सी.येथे सुरू केले असून अधिक माहिती साठी ग्राहकांनी प्लॉट नं. ३ येथे भेट द्यावी असे आवाहन सीईओ अरूण देशपांडे यांनी केले आहे