(रत्नागिरी)
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस पी हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये गांधी जयंतीच्या निमित्ताने सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.या सेवा सप्ताहात राष्ट्रीय सेवा योजना आणि सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व प्रदर्शन आणि भित्तीपत्रकाचे उद्घाटन विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने घेण्यात निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पंकज पवार, द्वितीय क्र. स्नेहल सुर्यराव, तृतीय क्र. मैथिली सावंत, उत्तेजनार्थ पारितोषिक तेजस पांचाळ, सानिया मोमीन यांनी पटकाविले. तर पोस्टर स्पर्धेत प्रथम क्र. स्नेहल सुर्यराव, द्वितीय क्र. मैथिली सावंत, तृतीय क्र. सायली मालप तर उत्तेजनार्थ पारितोषिक सानिया खतिब यांनी पटकाविले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. जयंती निमित्त अमृत गोरे या विद्यार्थ्यांने मनोगत व्यक्त केले या प्रसंगी प्रा. सुकुमार शिंदे, सुमित आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आशा जगदाळे, यांनी मनोगतं व्यक्त केली. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी महात्मा गांधींच्या सत्याग्रहांचा, विचारांचा व आजच्या बदलत्या प्रवाहाचा आढावा घेतला
या प्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहीले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुशील सावळी व आभार प्रा. प्रकाश पालांडे यांनी मानले.