(मुंबई/किशोर गावडे)
शिवसैनिकांच्या कष्टावर त्यांच्या कामावर, रक्तावर शिवसेना उभी राहीली असल्याने, तो प्रत्येक शिवसैनिक बीकेसी मैदानावर उपस्थित राहणार असल्याची ग्वाही ईशान्य मुंबई शिवसेना विभाग प्रमुख व माजी आमदार अशोक पाटील यांनी दिली.
दसरा मेळाव्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना अशोक पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याच्या संदर्भात बैठक पार पाडली गेली. शनिवारी आपण स्वतः मैदानाची पाहणी केली आहे.
अत्यावश्यक सुविधांबाबत वरिष्ठांशी विचार विनिमय करण्यात आला. प्रत्येकाला मोठ्या विश्वासाने जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. अतिशय उत्स्फूर्त असा जनतेचा प्रतिसाद मिळणार यात शंका नाही. शिवाय हा दसरा मेळावा “न भूतो न भविष्यती’ होणारच असल्याचे अशोक पाटील म्हणाले.
दसरा मेळाव्याला अलोट गर्दी होणार असून आकडेवारीवर आपण बोलत नसतो. फिल्डवर ग्राउंडवर शिवसैनिकांसह लोकांची गर्दी दिसेल. आपणासही रिझल्ट दिसतील, असेही अशोक पाटील यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात बोलताना सांगितले.