(मुंबई/सुरेश सप्रे)
प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आँनलाईन विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक शैक्षणिक निर्मित साहित्य गटातून पराग विद्यालय भांडूप मधील सहा.शिक्षिका मिनल योगेश चौधरी यांनी राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांकास राज्य पुरस्कार प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले आहे.
शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन समिती आयोजित जिल्हास्तरीय Online विज्ञान प्रदर्शन २०२१-२२ यात जिल्हास्तरीय प्रदर्शनात हि प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. त्यानी केलेल्या शैक्षणिक साहीत्याचे स्वरूप – ‘A To Z भूमिती’ या शैक्षणिक साहीत्यामधून ‘A To Z Alphabate च्या माध्यमातून इ १ ली ते इ. ८ वी या वर्गातील सर्व भौमितीक संकल्पना आद्याक्षरांच्या आकारातून स्पष्ट करून विद्यार्थ्यासाठी आनंददायी, स्वयं अध्ययन करण्यासाठी प्रवृत्त करणा-या शैक्षणिक साहीत्याची निर्मिती केली. या साहीत्याला राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत राज्य पुरस्कार प्राप्त झाला.
महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष बाळकृष्ण बने (शेठ) सचिव माजी आमदार डॉ. सुभाष बने, मुख्याध्यापक सी. एम. भारंबे यांनी अभिनंदन केले. तर शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग श्रीम. उर्मिला पारधे यांनी मिनल चौधरी यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.