(मुंबई)
माझ्या मतदारसंघात भाजपशी युती नको. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही, तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या-त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर विचार करण्यात यावा, शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत येऊ, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
अब्दुल सत्तार म्हणाले, की दिल्लीत आणि मुंबईतसह जिल्ह्यात, महापालिकेत, जिल्हा परिषदेत सोबत राहू. स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा असे दोघेच आहोत. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. जो निवडून येईल तो सत्ताधाऱ्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल.
निवडणुकीतील चिन्ह आणि आपल्या मतदारसंघातील आपली ताकद प्रत्येकाने आमजवून पहिली पाहिजे. मी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मला कुत्रं निशाणी दिली तरी मी निवडून येईन. कमकुवत माणसाला काहीतरी आधार लागतो. मी कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही, असे सत्तार म्हणाले. अब्दुल सत्तार यांच्या या विधानामुळे फडणीस-शिंदे सरकारमध्ये वरून दिसत असले तरी सारकाही आलबेल नसल्याचेच दिसत आहे.