(आरोग्य)
आपण निरोगी राहावे असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. परंतु वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे हे प्रत्येकाला शक्य होत नाही. निरोगी राहायचे असेल तर सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी, लिंबू पाणी किंवा इतर हेल्दी ड्रिंक्स प्यावे असा सल्ला अनेक लोक देतात. हे चांगलेही असते. यासोबतच आपण उपाशीपोटी देशी गाईचे तुपही खाऊ शकतो. तूप म्हणजे आहारातील महत्त्वाचा भागच आहे. वरण भात, पुरणपोळी, मोदक, खिचडी या पदार्थांची तूपाशिवाय आपण कल्पनाच करू शकत नाही. अनेक लोकांना सकाळी-सकाळी हेवी पदार्थ खायला आवडत नाही, आणि तुप हे हेवी असते. परंतु एका संशोधनात सिध्द झाले आहे की, उपाशीपोटी तुप खाल्ल्याने होणाऱ्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती जाणुन घेऊ
1. सर्व पेशी मजबूत होतात
आयुर्वेदानुसार तुप शरीरातील प्रत्येक पेशीला मजबूत करते. तुप आपण उपाशीपोटी खाल्ले तर हे शरीराच्या कोशिकांचे पालनपोषण करण्यात मदत करते. आपले संपुर्ण आरोग्य नियंत्रित करते.
2. त्वचा उजळ करते
तुपाचे सेवन केल्याने आपल्या कोशिका पुनर्जीवित होतात. यामुळे त्वचेमध्ये नैसर्गिक ग्लो येतो. यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो. स्किन ड्राय होत नाही.
3. संधीवातापासून आराम
तुपाचे सेवन केल्याने जॉइंटपेन आणि संधीवाताची समस्या होत नाही. तुप एक नॅचरल लुब्रीकेंटप्रमाणे काम करते. तुपामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असतात. हे ऑस्टियो- पोरोसिस होण्याची शक्यता कमी करते आणि हाडांना निरोगी ठेवते.
4. मेंदूला अॅक्टिव्ह ठेवते
तुम्ही सकाळी उपाशीपोटी तुप घेतले तर मेंदूच्या कोशिका अॅक्टिव्ह होतात. यामुळे नर्व्स प्रेरित होतात, यामुळे मेमरी आणि शिकण्याची क्षमता वाढते. याचे सेवन केल्याने अल्जायमर सारखे आजार होण्याची शक्यता कमी असते.
5. वजन कमी होते
अनेक लोकांना वाटत असते की, तुपाचे सेवन केल्याने वजन वाढते. परंतू उपाशीपोटी 5-10 एमएल तुपाचे सेवन केल्याने तुमचे मेटाबॉलिजम रेट वाढते आणि वजन कमी होते.
6. केस गळती थांबते
उपाशीपोटी सर्वात पहिले तुपाचे सेवन केल्याने केस हेल्दी राहतात. कारण केसांना पुर्ण न्यूट्रीएंट्स मिळतात. यामुळे केस मुलायम, चमकदार राहतात.
7. कँसरपासून बचाव
तुपामध्ये अँटी-कँसर गुण असतात. यामुळे शरीरात कँसर सेल्स तयार होत नाही. यामुळे कँसर टाळता येतो. तुपामध्ये कार्सिनोजन नावाचा घटक असतो ज्यामुळे कॅन्सरचा परिणाम कमी होतो. तसंच कॅन्सर वाढण्यासाठी जो ट्युमर निर्माण होतो त्याला रोखण्यासाठीही तुपाचा उपयोग होतो. याशिवाय तुपात असणारे लिनोलिक अॅसिड कोलनदेखील कॅन्सरपासून वाचविण्यासाठी मदत करते.
8. भूक शांत
तुपाचे सेवन केल्याने भूक शांत होते. तूप मर्यादित प्रमाणात सेवन करणे फायदेशीर आहे. तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे खराब फॅट्स काढून वजन कमी करण्यास मदत करतात.
9. कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण
तूप कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राखण्यास मदत करते. ज्यामुळे हृदय निरोगी राखण्यास मदत मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींमध्ये तुम्ही तूप मिसळून त्याचा वापर केल्यास, अँटिऑक्सिडंट्सचा प्रभाव चांगला दिसून येतो, जो शरीराला त्रासदायक ठरणारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतो.
10. प्रतिकारशक्ती वाढवते
निरोगी राहण्यासाठी प्रतिकारकशक्ती वाढणे अत्यंत गरजेचे आहे. आजारी पडणाऱ्या लोकांसाठी तूप नक्कीच फायदेशीर ठरते. तुपामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. वास्तविक तुपामध्ये कंजगेटेड लिनोलेनिक अॅसिडचे गुण आढळतात. हे अॅसिड रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत तर करतेच त्याशिवाय शरीरातील थकवा घालविण्यासही मदत करते. तसंच तूप हे एखाद्या ल्युब्रिकंटप्रमाणे शरीरात काम करते आणि स्पाईनची स्थिरता आणि ताकद मिळवून देते.
11. शौचाची समस्या
बऱ्याच जणांना शौचाला जाण्यास त्रास होतो. पोट साफ होत नाही. यावर तूप हा उत्तम उपचार आहे. रोज रात्री झोपताना तुम्ही एक ग्लास दुधामध्ये एक चमचा तूप मिक्स करा आणि ते प्या. यामुळे सकाळी तुम्हाला शौचाला साफ होईल अर्थात तुमचे पोट साफ होईल आणि त्याशिवाय मूळव्याधीचा त्रास असेल तर तोही संपेल. जुलाब होत असतील तरीही त्यावर तूप अत्यंत गुणकारी आहे. तूप आणि साखर एकत्र करून खाल्ल्यास लगेच आराम मिळतो.
12. इतर फायदे
सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने पचनक्रिया स्वच्छ आणि निरोगी राहते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यासारख्या शौचाशी संबंधित समस्या दूर होण्यास सुद्धा मदत होते. आयुर्वेदानुसार तुपाचे सेवन केल्यास लहान आतड्याची शोषण क्षमता सुधारते आणि आम्लता कमी करते.