(रत्नागिरी/प्रतिनिधी)
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये मुंबईमध्ये झालेल्या अंतिम फेरीमध्ये इन्स्टॉलेशन स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयामधील अक्षय वहाळकर, हर्ष कांबळे, पायल मोहिते, हलिमा पाटणकर विद्यार्थाला कास्यपदक प्राप्त झाले आहे. सक्सेस हा विषय इन्स्टॉलेशनसाठी आला होता. मुंबई विद्यापीठातील फाईन आर्ट मधील हा ग्रुप इव्हेंट असतो . त्यामध्ये कलात्मकता, सामाजिक भान, क्रिएटिव्हिटी आणि ग्रुप समन्वय याची गरज असते. सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करून घेऊन संघ तयार केला होता. प्रा.शुभम पांचाळ संघ व्यवस्थापक म्हणून मुंबई मध्ये काम पाहिले.
इन्स्टॉलेशन मधील कास्यपदकाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ.चित्रा गोस्वामी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक यांनी सुद्धा अभिनंदन केले आहे.