(देवरुख)
28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे वतीने संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांना माहितीचा अधिकार 2005 बाबत माहिती देण्यात आली. माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी यांना प्रत्येक गावागावात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, गावागावात आपले कार्यकर्ते तयार करून गावाच्या विकासाला हातभार लागावा यासाठी प्रयत्नशील राहावे, कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे असे आवाहन प्रचार संयोजक मनोहर गुरव यांनी आवाहन केले.
यावेळी प्रचार प्रमुख श्री एकनाथ मोहिते, सहसंपर्क प्रमुख श्री सुभाषराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. या छोट्याश्या कार्यक्रमात सक्रिय प्रचारक दत्ताराम लिंगायत, उपप्रचार संघटक श्री विजय साळुंखे, प्रचार संघटक श्री अनिल सागवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी प्रचार संयोजक श्री मनोहर गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.