[ संगमेश्वर /प्रतिनिधी ]
संगमेश्वरातील संगम ज्येष्ठ नागरिक संघ वार्षिक सर्वसाधारण रविवार ( 25 सप्टेंबर रोजी ) सभा संगमेश्वर येथील विधाता कलेक्शन हॉलमध्ये संपन्न झाली. या सभेला संगमेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख ही प्रमुख उपस्थित होते.
सभेच्या सुरवातीला दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संघाच्या कार्याविषयी व कार्यक्रमाविषयी तसेच ताळेबंद याविषयी कार्यवाहक श्री. उदय संसारे यांनी माहिती दिली. सभेमध्ये पंचाहत्तर वर्षावरील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
या सभेत संगम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपनिरीक्षक श्री. देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. माजी अध्यक्ष श्री.साळवी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्ष श्री. प्रमोद शेट्ये यांनी संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला व पुढील कार्यक्रमाविषयी माहिती देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळीं मुरलीधर पवार, प्रकाश कोळवनकर, विनय शेट्ये, प्रमोद पोवळे, भिकाजी साळवी, शशिकांत खातू, उदय संसारे, प्रभाकर भिडे आदी जेष्ठ नागरिक उपस्थित होते.