( संगमेश्वर / प्रतिनिधी )
रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील एका 34 वर्षीय विवाहीत महिलेला स्टोव्हच्या भडक्याने जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही महिला स्टोव्हच्या भडक्यात ८५ टक्के भाजली होती. या महिलेला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . योगिता प्रवीण मोहिते ( ३४ , करंबेळे , संगमेश्वर ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे .
सविस्तर वृत्त असे की , योगिता या जेवण करत असताना सोमवार २६ सप्टेंबर रोजी स्टोव्हचा भडका उडाल्याने भाजल्या. त्यांना संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले . जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी सायंकाळी उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना मंगळवार 27 रोजी सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.