( चिपळूण / प्रतिनिधी )
चिपळूणात विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या प्रौढावर धाड टाकून ताब्यात घेण्यात आले आहे . त्याच्याकडे सुमारे ५६ हजार ८०० रुपयांचे दारु गाळयाचे उपयोगी साहित्य , गूळ , नवसागर मिश्रित कुजके रसायन सापडले आहे . सदाशिव तुकाराम वरपे (६०. कळवंडे बरपेवाडी चिपळूण) असे ताब्यात घेण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे . त्याच्याकडून ४२०० रुपये किंमतीची १०० लीटर दारु , उकळते रसायन , पत्र्याची बॅरल तसेच १२०० रुपये किंमतीचे हातभट्टीचे साहित्य , ११ हजार १०० रु किंमतीची २१० लीटर गावठी हातभट्टीची दारु , ४० हजार ५०० रुपये किंमतीची ९ ०० लीटर गूळ , नवसागर मिश्रीत कुजके रसायन असा एकूण ५७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला . याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार आंबेरकर करत आहेत .