(दापोली)
कृषी महाविद्यालय दापोली येथील शिकत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी पुष्कर कुलकर्णी, साहिल जगदाळे, गौरेश चव्हाण, ताहुरा मणियार, संस्कृती पवार यांनी २४ सप्टेंबर रोजी जालगाव दापोली येथील शेतकऱ्यांना गांडूळखत निर्मितीसाठी काय उपलब्ध असावे लागते, तसेच त्याची संपूर्ण प्रकिऱ्या कशी असते याचे जुजबी मार्गदर्शन केले.
गांडूळखत निर्मितीसाठी कुठल्या जातीचे गांडूळ आवश्यक असते व ते कुठे उपलब्ध होते, याबाबत सर्व माहिती विद्यार्थ्यांनी दिली. त्याशिवाय तयार गांडूळ खत कुठे विकावे आणि आपल्या शेतीमध्येच त्याचा कसा योग्य वापर करावा याची माहिती देखील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना केली. विद्यार्थ्यांकडून याबाबत सर्व माहिती पोळ सर यांच्यासोबत सल्लामसलत करून देण्यात आली. यावेळी ग्रामस्थानी खूप शुभेच्छा देत आम्हाला असेच शेती विषेयक मार्गदर्शन व माहिती देण्याचे काम सतत करत रहा असे सांगितले.