( खेड / प्रतिनिधी )
कशेडी घाटात 23 सप्टेंबर रोजी झालेल्या ट्रेलरच्या अपघातप्रकरणी ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुगरीव रामनगीना यादव (30, रा उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर रोजी सुगरीव हा आपल्या ताब्यातील ट्रेलर घेवून गुजरात ते लोटे असा दारुचे सेवन करुन वाहन चालवत होता. यावेळी कशेडी घाटात निष्काळजीपणे, बेदारकारपणे आणि हयगयीने गाडी चालवून अपघात केला. अपघातात ट्रेलर संरक्षक कठडयावर आदळला. यामध्ये दोघेजण जखमी झाले. गौरव बाकेलाल कश्यप (28), संदीप रमेश कश्यप (29, दोन्ही मूळ उत्तरप्रदेश, सध्या रायगड) हे दोघे जखमी झाले. या अपघाताची फिर्याद पोलीस हवालदार विक्रम रतन बुरोंडकर यांनी खेड पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार ट्रेलर चालक सुगरीव याच्यावर दोघांच्या दुखापतीस आणि दारु पिवून ट्रेलर चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.