( हैद्राबाद )
हैद्राबाद येथे राजीव गांधी स्टेडियमवर शेवटच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमारच्या वादळी खेळीने, ‘विराट’ विजय मिळवण्यात यश आलं. ऑस्ट्रेलिया संघानं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 187 धावांचं लक्ष्य ठेवलं होत. या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं 19.5 षटकामध्ये सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकली. सूर्यकुमारच्या गगनचुंबी षटकरानी प्रेक्षकाची मने जिंकली. विराट कोहलीने पुन्हा आपला जलवा दाखवत कांगारुला लोलवले. सूर्यकुमार यादवने 69 धावा केल्या, तर कोहलीने 63 धावांची खेळी केली.
सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने कोहलीला चांगली साथ दिली. दोघांनीही उत्तम कामगिरी केल्यामुळे भारताला लक्ष्य गाठण्यात यश मिळाले. शेवटच्या 20 व्या ओव्हर्समध्ये अतितटीचा सामना सुरू असताना फिनिशर दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या मैदानात होता. परंतु हार्दिक पंड्याने शेवटच्या क्षणी चौकार मारून उत्कृष्ट कामगिरी करत हे आव्हान पूर्ण केलं. भारतीय संघाला मायदेशात तब्बल नऊ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत पराभूत करण्यात यश आले आहे.