(गणपतीपुळे/वैभव पवार)
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता क्षेत्राकडे पाहिले जाते. तसेच पत्रकार हा समाजाचा आरसा मानला जातो. त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काम ओळखून आणि पत्रकार हा समाजातील आरसा मानला जात असल्याप्रमाणे ग्रामीण भागातील पत्रकारांना हाताशी धरून समाजातील अनेक अन्यायग्रस्त समस्यांना वारसा फोडण्याचे काम रत्नागिरी 24 न्यूज ने हाती घेण्याचा संकल्प गतवर्षी केला. पहिल्याच वर्षभरात लाखो वाचकांपर्यंत आपल्या बातम्यांची विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी जपून आपले अत्यंत प्रभावी व प्रशंसनीय काम डिजिटल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी खऱ्या अर्थाने एक मानाचे व्यासपीठ रत्नागिरी 24 न्यूज च्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. एकूणच माझ्यासारख्या पत्रकाराच्या बाबतीत सांगायचे म्हटले तर खऱ्या अर्थाने प्रिंट मीडियामध्ये काम करीत असताना वृत्तपत्रातून आम्हांला लाखो वाचकांपर्यंत दररोज पोचता येते. मात्र, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून रत्नागिरी 24 न्यूज ने आपली पत्रकारिता सुरू केल्यानंतर खऱ्या अर्थाने लेखणीची धार लाखो वाचकांपर्यंत झटपट पोहोचवून आम्हांला मानाचे स्थान मिळवून दिले आहे.
रत्नागिरी 24 न्यूज च्या सर्व टीमचे काम कौतुकास्पद असून ग्रामीण भागातील पत्रकारांना त्यांच्या बातम्यांची प्रसिद्धी मिळवून देताना आपलेही नावलौकिक केले आहे. आज जिल्ह्यातील नंबर १ चे डिजिटल माध्यम म्हणून रत्नागिरी 24 न्यूजकडे पहिले जाते. आगामी काळात आणखी दर्जेदार होत, सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणारे हे नेटवर्अक महाराष्ट्रात अग्रेसर असेल आशावाद वाटतो.
पुन्हा एकदा पहिल्याच वर्षभरात अतिशय धडाकेबाज आणि कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या 24 न्यूज च्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील उज्वल वाटचालीकरिता मंगलमय शुभेच्छा!