कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र देशामध्ये लसींचा प्रचंड तुटवडा आहे. सध्या 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसी दिली जात आहे. पण बर्याच राज्यांना कोरोना लसीच्या तुटीचा सामना करावा लागत आहे. आता लसीची कमतरता दूर करण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलण्याची तयारी करत आहे. कोरोना लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार इतर कंपन्यांना कोवाक्सिन बनविण्याची परवानगी देण्याच्या तयारीत आहे.आम्ही यासाठी तयार आहोत आणि ही लस बनविणाऱ्या कंपन्यांशीही चर्चा करीत आहोत असे केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडावीया म्हणाले.