(रत्नागिरी/प्रतिनिधी)
मिरजोळे ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय शंकर पंड्ये यांची बिनविरोध निवड झाली आहे. १६ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेला जमलेल्या ग्रामस्थांनी सलग तिसऱ्या वर्षी संजय पंडये यांची बिनविरोध निवड केली आहे.
संजय पंडये यांनी आपल्या कालावधीत गावातील अनेक भांडण-तंटे चे निवारण करून सामाजिक कार्यात मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या या निवडीमुळे तंटामुक्ती अध्यक्ष पदी योग्य माणूस बसल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे, तसेच गावपातळीवर कौतुक करण्यात येत आहे.