(रत्नागिरी/प्रतिनिधी)
कोणत्याही व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींचा पतसंस्थांच्या कार्यभारावरही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत सहकार क्षेत्रातील जुजबी माहिती असताना २०१९ साली स्थापन झालेल्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी या संस्थेने सभासदांची विश्वासाहर्ता वाढवून ग्राहकांचा आर्थिक विकास साधत प्रगतीपथावर असणारी संस्था म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आली आहे.
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ अखेर केवळ ४० महिन्याच्या कार्यकाळात १८लाख २२ हजाराचा नफा प्राप्त करत ‘अ’ वर्ग प्राप्त करून जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची ही वाटचाल खऱ्या अर्थाने विश्वासहार्य होताना दिसत आहे.
गत ४० महिन्याच्या कालावधीमध्ये जवळ-जवळ २०महिन्याचा कालावधी कोव्हीड-१९ या महामारीने ने ग्रासलेला होता. दिर्घकालीन लॉकडाऊनमुळे क्षतीग्रस्त व्यवसाय, ठप्प झालेले जनजीवन या सर्वांमध्येही ग्राहकांना नियोजनबद्ध, नम्र व जलद सेवा देत शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणांचा त्यांचे अंमलबजावणीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न केल्यामुळे सर्वच आदर्श प्रमाणांच्या बाबतीत संस्थेने यशस्वीपणे काम केलेले आहे.
अल्पावधीतच संस्थेचा आर्थिक सक्षमतेचा पाया भक्कम झालेला आहे. संस्था आपल्या आर्थिक सक्षमते बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत तसेच सभासदांच्या हिताला प्राधान्य देत असतानाच ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक स्पर्धेच्या या युगात अर्थकारणाची गती राखण्याचं आव्हान आमच्या खारवी सामाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने पेलले. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत “खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने” आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णू केला आहे.
जिल्हा स्थरावरचे कार्यक्षेत्र असतानाही १ शाखा व १ सेवाकेंद्राच्या आधारावर सलग ४ वर्षे ‘अ’वर्ग प्राप्त करत, आदर्श प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात नफा असणारी संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. पहिल्या वर्षापासूनच सभासदांना शेअर्स च्या रकमेवर लाभांश देणारी ही पतसंस्था आहे ४० महिन्यात सोने तारण कर्ज मुदतीत कर्ज खाते बंद करून एकही कर्ज खात्याचा लिलाव न करण्यास पात्र ठरलेली पतसंस्था आहे.
संस्थेचा संपूर्ण व्यवहार संगणिकृत असून सभासदांचे मनोबल उंचावून सभासदांमध्ये खऱ्या अर्थाने सहकार रुजवणारी पतसंस्था आहे. अल्पावधीतच शाखाविस्तारांचा प्रस्ताव सादर करणारी ही पहिली पतसंस्था ठरली आहे. संस्थेच्या अर्थचक्राला उत्तम सेवा देऊन गतिमान करणारे १३ जणांचे संचालक मंडळ ५ जणांचा कर्मचारी वर्ग, १३ जणांचे जिल्हा समनव्य समिती मंडळ व नवनियुक्त १ तज्ञ संचालक आहेत.
संस्थेचे गतिमान झालेले मार्गक्रमण संपूर्ण जिल्ह्याला गवसणी घालते आहे. अत्यल्प थकबाकी, विक्रमी वसुली ही परंपरा कायम ठेवण्यात संस्था याही वर्षी यशस्वी झाली आहे. आपल्या अर्थकारणात व्यावसायिकता आणि सहकारतत्त्व यांची सांगड घालून विस्तारत आहे. सहकारातील सामुहिक ताकद निर्माण करताना नवतंत्रज्ञान, व्यवसाय, संधी याचा कायद्याच्या परिघात राहत अचूक लाभ उठवत ग्राहकांनाही या लाभात सहभागी करून घेणारी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला आज यांचा सन्मान जाहीर झाला आहे.
ग्राहकांचा विकास साधत प्रगतीचे शिखर गाठणा-या महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था या इतर पतसंस्थेसाठी Roll Model असतात आणि यांचे गुणांकन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.करीत असतात.
जेमतेम चार वर्षात खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी यांनी सर्व प्रकारचे आर्थिक निकष पूर्ण करीत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. चा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार २०२२ गट क्र १ मध्ये १ ते १० कोटी ठेवी असणा-या गटांमध्ये कोकण विभागांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कारासाठी समावेश झाला आहे. आपल्या सर्वांच्या एकजूटीने, परिश्रमाने व कामातील सातत्याने अल्पावधीतच दिपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला याचा सार्थ अभिमान असून सर्व प्रशासकीय अधिकारी, संचालक, समन्वय समिती, सभासद व हितचिंतक यांना संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी आभार मानले.
या पुरस्काराचे वितरण ग्रिनलिप रिसाँर्ट येथे १९ सप्टेंबर २०२२ रोजी काकासाहेब कोयटे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या हस्ते सौ.सुरेखा लवांडे सिईओ, दिपक पटवर्धन तज्ञ संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीचे सर्व संचालक व सिईओ उपस्थित होते. सहकार क्षेत्रात नवीनच असणा-या या संस्थेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सर्व सहकारी क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.