(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथे ग्रामपंचायत पिरंदवणे अंतर्गत झालेल्या ग्रामसभेत गावातील मानकरी श्री. अरविंद मुळे यांची पिरंदवणे तंटामुक्ती अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
श्री. अरविंद मुळे गावातील ग्रामदेवता मंदिराचे पूर्वसत्तेचे मानकरी आहेत. गावातील प्रश्नांची त्यांना योग्य जाण आहे. या सर्व समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. याची जाणीव लोकांना असल्यानेच त्यांना तंटामुक्ती समितीचे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळाली आहे.
गावचे पोलीस पाटील श्री. अनिल भामटे यांनी श्री. मुळे यांचे नाव सुचवले. याला गावातील प्रतिष्ठीत नागरिक श्री. सुभाष जांभळे व माजी सरपंच श्री. दशरथ घेवडे यांनी अनुमोदन दिले. ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रकाश गमरे यांनी निवड झाल्यानंतर शाब्दिक अभिनंदन केले. तसेच विद्यमान सरपंच श्री. विश्वास घेवडे यांनी नूतन अध्यक्षांना पुष्प देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामसेविका सौ. माया गुरखे, उपसरपंच सौ. अंजली मेस्त्री तसेच अन्य ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.